बातम्या

दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणाऱ्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू

Accidental death of three youths going to triple seat on two


By nisha patil - 1/29/2024 5:11:01 PM
Share This News:



सोलापूरात एक दुर्देवी घटना घडली आहे. दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलाआहे. या अपघाताने सोलापूरमधील तीन तरुण दगावल्याने हळहळ व्यक्त केली आहे.

इरण्णा मठपती , निखिल कोळी  , दिग्विजय सोमवंशी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघेही मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरुन जात होते.दरम्यान सोलापूर येथील महावीर चौक येथे आले असता मध्यरात्री दुचाकी झाडावर धडकली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची बातमी पोलिसांना मिळाली. ते घटनास्थळी दाखल होऊन बेशुद्धावस्थेत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणाऱ्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू