बातम्या
डीसीबी बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
By nisha patil - 3/22/2025 1:21:46 PM
Share This News:
डीसीबी बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
निगडेवाडी येथे डीसीबी बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोंविदा राममिलन निसाद याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 72 तासात अटक केली.
आरोपी निसाद याने बुधवारी 19 मार्च रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास निगडेवाडी इथल्या डी सीबी बँकेच्या बाहेरील एटीएम मशीनवर असलेल्या सी सी टिव्हीवर अनोळखी व्यक्तीने स्प्रे मारुन एटीएम मशीनचा खालील बाजूस असलेला पत्रा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.या गुन्हयांची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली होती. यानुसार तपास सुरू असताना आरोपी निसाद हा दत्तात्रय निगडे यांच्या घरी भाड्याने रहात असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी छापा टाकून निसाद याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या कडुन गुन्हयांत वापरलेले ग्रायंडर मशीन,स्प्रे,गुन्हा करताना अंगावर असलेली कपडे,मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 17 हजार 400/ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 72 तासात गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून त्याला पुढ़ील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलय.
ही स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसूटगे पोलिस महेद्र कोरवी,योगेश गोसावी ,वैभव पाटील,विशाल खराडे,शिवानंद मठपती यांच्यासह आदीने केली.
डीसीबी बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
|