बातम्या

गांजा तस्करीप्रकरणी रेकॉर्डवरील आरोपी अटकेत

Accused on record arrested in ganja smuggling case


By nisha patil - 7/2/2025 9:57:56 PM
Share This News:



गांजा तस्करीप्रकरणी रेकॉर्डवरील आरोपी अटकेत

कोल्हापूर : (प्रतिनिधी) – पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून एका रेकॉर्डवरील आरोपीला गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १.५० च्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव चरण हुजूर भाट असे असून, त्याच्याकडून २ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चरण हुजूर भाट हा संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव आणि डीबी स्टाफच्या पथकाने त्याच्या घराजवळ सापळा रचला. रात्री १.५० च्या सुमारास एक इसम हातात काळ्या रंगाची पिशवी घेऊन जात असल्याचे दिसले. पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुशील गायकवाड, विकास चौगले आणि महिला पोलीस अंमलदार कांचन देसाई यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला.

त्याचवेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, मिलिंद बांगर, इंद्रजीत भोसले आणि सुशील गायकवाड यांनी वेळीच कारवाई करत आरोपीला पकडले. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये २ किलो २०० ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत ३९,६०० रुपये इतकी असून, सदर आरोपी हा पूर्वीपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषध व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या कलम ८(सी), २०(बी) (ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत.


गांजा तस्करीप्रकरणी रेकॉर्डवरील आरोपी अटकेत
Total Views: 122