विशेष बातम्या

अल्पवयीन प्रेयसीला संपवणाऱ्या आरोपीला अटक

Accused who killed minor girlfriend arrested


By nisha patil - 5/29/2023 8:01:08 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम एका वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या करणारा आरोपी प्रियकर साहिलला  अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री, दिल्लीतील  शाहबाद डेअरी परिसरात  ही खळबळजनक घटना घडली. आरोपी साहिलकडून अल्पवयीन प्रेयसीवर वार करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे. दिल्लीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचण्याआधी तिच्यावर 40 वेळेस चाकूने वार केले.  मृत्यूमुखी पडलेली अल्पवयीन मुलगी ही शाहबाद डेअरी परिसरातील जे.जे.कॉलनीमधील रहिवासी होती. रस्त्यावर ही अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली असल्याचे दिसून आले. पीडित अल्पवयीन मुलगी ही रस्त्यावर जात असताना आरोपीने तिला हटकले आणि तिच्यावर हल्ला केला. आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी हे दोघही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. मात्र, त्यांच्या किती वर्षांपासूनची ओळख होती, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


अल्पवयीन प्रेयसीला संपवणाऱ्या आरोपीला अटक