विशेष बातम्या
महिला दिन विशेष : "यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" सोहळ्यात कर्तृत्वाचा गौरव
By nisha patil - 8/3/2025 10:39:26 PM
Share This News:
महिला दिन विशेष : "यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" सोहळ्यात कर्तृत्वाचा गौरव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत यशस्वी मंचच्या वतीने "यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नागरी हक्क संरक्षण विभाग) स्वाती गायकवाड, डॉ. स्वरूपा गायकवाड, तसेच जयश्री सरिकर वकीलकर या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. "यशस्वी मंचच्या संस्थापिका अध्यक्ष सौ मोहिनी वनकुंद्रे आणि स्वप्नाली जगोजे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सूत्रसंचालनाची धुरा संजना गाढवे यांनी समर्थपणे सांभाळली, तर "तारा न्यूज" मीडिया पार्टनर म्हणून या गौरव सोहळ्याचा भाग बनली.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांना पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा देण्याचा यशस्वी मंचचा उद्देश यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
महिला दिन विशेष : "यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" सोहळ्यात कर्तृत्वाचा गौरव
|