बातम्या

कोल्हापुरात अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Action on Illegal Gas Refilling Stations in Kolhapur


By nisha patil - 2/25/2025 8:54:06 PM
Share This News:



कोल्हापुरात अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर, : उमा टॉकीज चौकातील आनंद ऑटो गॅरेजमध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर आज पुरवठा विभागाच्या पथकाने धाड टाकली. कारवाईदरम्यान १६ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व एचपी मोटर असा ६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यापूर्वीही २०२४ मध्ये याच ठिकाणी कारवाई करून महादेव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याने संभाव्य अपघाताचा धोका असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

कारवाई पथक:

🔹 जिल्हा पुरवठा अधिकारी: मोहिनी चव्हाण
🔹 अन्नधान्य वितरण अधिकारी: नितीन धापसे पाटील
🔹 पुरवठा निरीक्षक: महेश काटकर, भाऊसाहेब खोत

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कारवाईचे अभिनंदन केलेअशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.


कोल्हापुरात अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 41