बातम्या
वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई
By nisha patil - 5/3/2025 3:30:49 PM
Share This News:
वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेनरोड परिसरात मंगळवारी अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मेनरोड वरील स्क्रॅप, दीर्घकाळ बंद अवस्थेत असणा-या व वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडया काढण्याची कार्यवाही करण्यात आली.
ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यामार्फत संयुक्त करण्यात आली. ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी नंदकुमार मोरे, महापालिका व पोलीस कर्मचा-यांमार्फत करण्यात आली.
वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई
|