विशेष बातम्या

संभाजी ब्रिगेडने केला पर्दाफाश: घाणवडे येथील पाच दुध संस्था वर कारवाई

Action taken against five milk institutions in Ghanawade


By nisha patil - 6/21/2023 5:14:53 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या घाणवडे येथे दूध संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वजन काट्यांमध्ये फेरफार करून उत्पादकांची लूट सुरू असल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांच्या तक्रारीतून समोर आलाय. रुपेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून वैध आपण शास्त्र विभागाच्या पथकाने घालवडे इथं पाच दूध संस्थांवर छापा टाकून कारवाई केली आहे. गानवडीतील 23 दुध संस्थांपैकी इंदिरा महिला दूध संस्था गोपाळराव पाटील दूध संस्था शिवशंभो दूध संस्था हनुमान दूध संस्था शिवप्रसाद सहकारी दूध संस्था यामध्ये दूध संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वजन काट्यात फेरफार केला जातो अशी तक्रार उत्पादकांनी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर पाटील यांनी वैध मापन शास्त्र विभागाच्या कार्यालयात जाऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. याची गंभीर दखल घेत विभागाच्या पथकाने संबंधित दूध संस्थांच्या वजन काट्यांची तपासणी केली असता त्यामध्ये दोष दिसून आलाय संबंधित दूध संस्थांवर न्यायालयात खटले दाखल करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिलीय


संभाजी ब्रिगेडने केला पर्दाफाश: घाणवडे येथील पाच दुध संस्था वर कारवाई