बातम्या
फुटबॉल स्पर्धेत हाणामारी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई
By nisha patil - 2/4/2025 3:21:00 PM
Share This News:
फुटबॉल स्पर्धेत हाणामारी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई
के एस ने उचललं कठोर पाऊल
उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंत झालेल्या हाणामारी आणि हुल्लडबाजीप्रकरणी आता के एस ए ने कारवाई केली आहे. पीटीएमचा ओंकार शिवाजी मोरे व शिवाजी मंडळाचा संकेत नितीन साळोखे यांच्यावर सध्याच्या हंगामातील फुटबॉल सामने खेळण्यास बंदी घातली आहे. तसेच वारंवार गैरवर्तणुकीबद्दल ओंकार मोरे याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
याचबरोबर दोन्ही संघातील नऊ खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे.पाटाकडील तालीम मंडळाचे 5 व शिवाजी मंडळाचे चार अशा एकूण नऊ खेळाडूंवर पुढील दोन सामने खेळण्यास बंदी घालण्यात आलीय. यामध्ये पाटाकडील तालमीच्या यश नामदेव देवणे, ऋषीकेश गणेश मेथे पाटील, ऋतुराज कुमार सूर्यवंशी, जय अभय कामत, रोहित राजेंद्र पोवार या पाच तर शिवाजी तरुण मंडळाच्या करण रविंद्र चव्हाण बंदरे, विशाल वसंत पाटील, सुयश संजय हंडे, अमन शौकत सय्यद यांचा समावेश आहे.
फुटबॉल स्पर्धेत हाणामारी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई
|