बातम्या

कार्यकर्त्यांनी मानले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे आभार...

Activists thank Mana Mahayuti candidate Dharishsheel Mane


By nisha patil - 4/17/2024 6:55:12 PM
Share This News:



आज हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मागील पाच वर्षांमध्ये पारगाव गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2कोटी 9 लाख रुपये रस्त्यासाठी 25/15 योजनेअंतर्गत दहा लाख रुपये,मातंग समाजासाठी नऊ लाख रुपये, चर्मकार समाजासाठी नऊ लाख रुपये, पांढरबळी वस्तीसाठी दहा लाख रुपये चा विकास निधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे आभार मानून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, माजी सरपंच  प्रकाश देशमुख, बाळासाहेब बंडगर,  पांडुरंग सिद्ध, जगन्नाथ डोईजड, मा. बाबासो मोरे, डाॅ. टी. जी पाटील,जुनी पारगाव सरपंच तुकाराम पवार, माजी सरपंचमा. संदीप कांबळे,  मेहबूब शिगावे, उपसरपंच निवास पाटील, संदीप देशमुख, रणधीर सिद्ध,  अमोल शिंदे, राम जाधव, महादेव देशमुख,  शिवदत्त मानगावे,  राजेंद्र डोईजड,  बाळासाहेब बोने व नागरिक उपस्थित होते.


कार्यकर्त्यांनी मानले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे आभार...