बातम्या
अभिनेता साहिल खान महादेव ॲप मुळे अडचणीत
By nisha patil - 12/14/2023 3:26:22 PM
Share This News:
महादेव अॅप प्रकरणातील आरोपी महादेव बुकचा प्रवर्तक रवी उप्पल याला मुंबई पोलिसांनी दुबईत अटक केली. त्याच्या अटकेनंतर अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. अटक केलेला आरोपी रवी उप्पल आणि त्याचा सहकारी नीरज चंद्राकर 6,000 कोटी रुपयाच्या मनी लँड्रींग प्रकरणाचा मास्टरमाइंड या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव घेतले जात आहे. एकीकडे ६००० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगचा प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. त्यावेळी मुंबई पोलीसांनी एसआयटी स्थापन केली आहे. त्यात सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला समन्स पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महादेव ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हाही केला आहे. या प्रकरणात ईडीकडून सेलेब्रिटींची चौकशी सुरू आहे. त्यात साहिल खान याचाही समावेश आहे. या प्रकरणात साहिल खान याने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्यामुळे त्याला समन्स पाठवून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अभिनेता साहिल खान महादेव ॲप मुळे अडचणीत
|