बातम्या

अभिनेता विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज

Actor Vicky Kaushals movie The Great Indian Family released on OTT platform


By nisha patil - 11/17/2023 7:42:10 PM
Share This News:



 बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली'  हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिनेमागृहात जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला होता. आता ओटीटीवर किती धुमाकूळ घालणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. या विनोदी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिनेमागृहात रिलीज झाल्याच्या दीड महिन्यांनी आता सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचं कथानक भजन कुमार या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे. एका कट्टर हिंदू असणाऱ्या भजन कुमारला तो मुस्लिम असल्याचं कळतं. त्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं, त्याच्या आयुष्यात काय ट्विस्ट येतात हे प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 5.65 कोटींची कमाई केली होती.


अभिनेता विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज