अभिनेता विवेक ओबेरॉयची झाली फसवणूक
By surekha - 7/21/2023 3:55:50 PM
Share This News:
अभिनेता विवेक ओबेरॉयची झाली फसवणूक
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची फसवणूक झाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.55 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी अभिनेत्याला एका कार्यक्रमात पैसे गुंतवायला लावले आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्या पैशांचा वापर केला, असा आरोप अभिनेत्याने केला आहे. विवेक 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी ओबेराय यांना आरोपींनी 1.55 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले यातून प्रचंड आर्थिक फायदा होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र चित्रपट निर्मिती न करता ती सर्व रक्कम आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. म्हणून विवेक ओबेराय यांनी मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीची तक्रार दिली आहे.पोलिसांनी याप्रकरणी कलम 34, 409, 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिने-निर्माते संजय शहा, त्यांची आई नंदिता शाह, राधिका नंदा या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपांच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विवेक ओबेरॉय आणि आरोपी यांना सिने-निर्मिती संबंधित एक कंपनी सुरू करायची होती. विवेकने याआधी 2017 मध्ये 'ओबेरॉय ऑरगॅनिक्स नावाची कंपनी सुरू केली होती. पण या कंपनीच्या माध्यमातून नफा मिळत नसल्याने त्यांनी तीन आरोपींना फर्ममध्ये भागीदार म्हणून आणण्याचा निर्णय घेतला. पण भागीदारांनी फसवल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉयची झाली फसवणूक
|