बातम्या
कलाकारांना पक्षाच्या वतीने न्याय देणार - :- प्रियाताई बेर्डे
By nisha patil - 3/29/2024 7:10:15 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपाच्या विविध आघाडी-मोर्चा यांच्या बैठका सातत्याने सुरु असून नुकतीच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभागिय बैठक कोल्हापूर भाजपा जिल्हा कार्यालयात पार पडली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, कला सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजिका प्रियाताई बेर्डे, कला सांस्कृतिक आघाडी जिल्हा संयोजक सतीश आंबर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर भाजपा कला सांस्कृतिक आघाडीच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश संयोजिका प्रियाताई बेर्डे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकात आजच्या या बैठकीच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा संयोजक सतीश आंबर्डेकर यांनी सर्व कला क्षेत्रातील सर्व कलाकारांनी एकजुटीने काम करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपला हातभार लावण्याचे आवाहन सर्वांना केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र चित्रपट सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव माने, कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ सदस्य जयसिंग पाटील, वादक संघटनेचे उपाध्यक्ष इंद्रजीत जोशी यांचा प्रियाताई बेर्डे व महेश जाधव यांच्या हस्ते भाजपामध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला.
याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महाराष्ट्र प्रदेश संयोजिका प्रियाताई बेर्डे यांनी कलाकारांसाठी असणाऱ्या सरकारी योजनांची माहिती दिली व सर्व स्तरांवरील कलाकारांच्या समस्या सरकार मार्फत सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तळागाळातील सर्व कलाकारांचा विचार करुन प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे व पुढील सर्व निवडणुकांमध्ये सर्व स्तरांवरील लोककलाकारांना प्रचाराच्या माध्यमातून संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कलाकारांचे प्रश्न सोडविण्याला पक्षाकडून प्राधान्य दिले जाईल असेही सांगितले.
संघटनमंत्री राहुल वैद्य यांनी प्रत्येक कलाकार संघटीत होण्यासाठी घरोघरी जाऊन संपर्क साधला पाहिजे व प्रत्येक कलाकाराला काम मिळण्यासाठी गुगलच्या माध्यमातून कलाकारांचे एकत्रीकरण कसे करता येईल याची माहिती दिली. तर पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र आमले यांनी भाजपा व सांस्कृतिक प्रकोष्ठ यांचा समन्वय साधून निरनिराळे उपक्रम राबवले जातात याची माहिती दिली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव व जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या माध्यमातून संघटन बांधणीसाठी तसेच मोदिजींच्या योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोचण्यासाठीच्या विविध कार्यक्रमाना सर्वते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (पूर्व)सहसंयोजक प्रदिप कांबळे, इचलकरंजी शहर संयोजक मनिष आपटे, इचलकरंजी शहर सहसंयोजक पद्माकर कुरकुटे, इचलकरंजी शहर सहसंयोजक श्रीपाद कुलकर्णी, शिरोळ तालुका संयोजक विश्वनाथ जोशी, शिरोळ तालुका शहर सहसंयोजक विनायक सुर्यवंशी, शिरोळ तालुका सहसंयोजक संदिप देशमुख यांना नियुक्ती पत्रे प्रदान करणेत आली.
सुत्रसंचालन श्वेता कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांची ओळख अभयकुमार नेर्लेकर यांनी करून दिली. मंजिरी देवाणावर यांनी आभार मानले. स्वरदा देसाई यांच्या पसायदानाने पहिल्या सत्राची सांगता झाली. नियोजनाची धुरा मानसी गुळवणी यांनी सांभाळली.
या बैठकीसाठी पुणे, सोलापूर, सांगली, चिंचवड, कोल्हापूर विभागातील व्यंकटेश बिदनूर, धनंजय वाठारकर, विद्याताई पोकळे पाटील, अपर्णा गोसावी , संजय हिरवे ,अनंत जोशी ,कविता बंकापुरे ,प्राची परांडेकर, देविदास सबनीस, नंदू बेलवलकर, सुनिल चिंचणेकर , अभिजित घागरे, सचिन पारेख ,अपर्णा पटवर्धन, माणिक जोशी , श्रीपाद मेरबाळकर, किरण पत्रके, मिलिंद पटवर्धन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कलाकारांना पक्षाच्या वतीने न्याय देणार - :- प्रियाताई बेर्डे
|