बातम्या

अभिनेत्री आकांक्षा मल्होत्रा २० वर्षानंतर सिनेइंडस्ट्रीत कमबॅक

Actress Akanksha Malhotra is making a comeback in the cine industry after 20 years


By nisha patil - 5/16/2024 5:24:43 PM
Share This News:



 अभिनेता सलमान खानसोबत  अनेक अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. यातील अनेक अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीत स्थिरस्थावर झाल्या आहेत. तर, काहींना आपली छाप सोडण्यास अपयश आले. सलमानच्या डॅशिंग रोलसोबत विनोदी भूमिकांनादेखील प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. 2004 मध्ये सलमानचा ॲक्शन ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका केली होती. चित्रपटात सलमानसोबत आणखी एक स्टारकिड दिसली. ही स्टारकिड इंडस्ट्रीत फार काळ टिकू शकली नाही. या अभिनेत्रीने चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर तिने सिनेइंडस्ट्रीपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. आता ही अभिनेत्री 20 वर्षानंतर इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे.


अभिनेत्री आकांक्षा मल्होत्रा २० वर्षानंतर सिनेइंडस्ट्रीत कमबॅक