बातम्या

अभिनेत्री गौतमी देशपांडे अडकली विवाह बंधनात

Actress Gautami Deshpande got married


By nisha patil - 12/25/2023 6:57:46 PM
Share This News:



अभिनेत्री गौतमी देशपांडे अडकली विवाह बंधनात

छोट्या पदड्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे विवाहबंधनात अडकली आहे. स्वानंद तेंडुलकर सोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. जवळच्या नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थितीत आज हा विवाहसोहळा पार पडला.
 

अभिनेता सारंग साठ्येने गौतमी देशपांडेच्या लग्नातील काही फोटो इंस्टा स्टोरीवर ठेवत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये गौतमीने मोती रंगाची साडी नेसली असून स्वानंदने तिच्याशी मिळत्या जुळत्या रंगाचा कुर्ता घातला आहे. सारंगने गौतमी-स्वानंदचा सप्तपदी घेतानाचा फोटो त्याच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन दिवसांपूर्वीच दोघांनी त्यांच्या नात्याची सोशल मिडीयावर कबुली दिली. त्यानंतर लगेच हळदी आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. स्वानंद तेंडुलकर हा  ‘भाडिपा’ या युट्यूब चॅनलचा ‘व्हाईस प्रेसिडंन्ट’ आहे. मराठी कंटेंट क्रिएटरमधलं स्वानंद तेंडुलकर हे अग्रेसर नाव आहे.


अभिनेत्री गौतमी देशपांडे अडकली विवाह बंधनात