बातम्या

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत

Actress Malaika Arora is currently in the news for a different reason


By nisha patil - 12/29/2023 5:12:59 PM
Share This News:



अभिनेत्री मलायका अरोरा  सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत

 अभिनेत्री मलायका अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने 'झलक दिखला जा 11'च्या मंचावर दुसऱ्या लग्नाबद्दल मोठी हिंट दिली आहे. या कार्यक्रमातील प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा अरबाज खानसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण काही कारणाने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेता आणि निर्माता असणारा अरबाज सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत लग्नबंधनात अडकला. अशातच आता अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायकानेदेखील दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मलायका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा 11'चं परिक्षण करत आहे. मलायकासह फराह खान, अरशद वारसीदेखील परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात मलायकाने दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान मलायकाला विचारते,"2024 मध्ये तू अभिनेत्री आणि सिंगल पॅरेंट असणार की अभिनेत्री आणि डबल पॅरेंट असणार?". यावर उत्तर देत मलायका म्हणते,"मला पुन्हा कोणालातरी दत्तक घ्यावे लागेल". यावर गौहर खान म्हणते,"तू दुसरं लग्न करणार आहेस का?".

गौहरच्या प्रश्नाचं उत्तर देत मलायका म्हणते,"एखादी चांगली व्यक्ती असेल तर नक्कीच मी 100% लग्न करण्याचा विचार करेल. मला कोणी लग्नसाठी मागणी घातली तर मी पुन्हा संसार थाटेल". मलायकाच्या या वक्तव्यामुळे ती दुसऱ्या लग्नासाठी तयार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


अभिनेत्री मलायका अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत