बातम्या

अभिनेत्री प्रिया बेर्डें 'सिंधुताई माझी माई 'मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

Actress Priya Baird will play the lead role in Sindhutai Majhi Mai series


By nisha patil - 4/8/2023 4:55:17 PM
Share This News:



मुंबई : अभिनेत्री प्रिया बेर्डे 'सिंधुताई माझी माई' या मालिकेच्या माध्यमातून सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळयांची गोष्ट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे मुख्य भूमीकेत दिसणार आहे .या मालिकेत त्या पार्वती साठे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
         

याबाबत अधिक माहिती अशी कि ,'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेत अभिनेत्री अनन्या टेकवडे चिंधीची भूमिका साकारणार आहे. तर छोट्या पडदा गाजवणारा किरण माने  या मालिकेत अभिमान साठे म्हणजेच चिंधीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चिंधीची आई म्हणजेच हिरु साठेच्या भूमिकेत अभिनेत्री योगिनी चौक दिसणार आहे. तसेच प्रिया बेर्डे या मालिकेत चिंधीच्या आजीच्या म्हणजेच पार्वती साठेच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 दरम्यान या मालिकेत वात्सल्याचा मानबिंदू, ममतेचा झरा म्हणेज सिंधुताई. लाखो अनाथ बालकांना सिंधुताईंनी करुणेचं आभाळ दिलं... त्यांचं संगोपनचं नव्हे तर प्रत्येकाची वैचारीक जडणघडण केली. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आता आपल्याला बघता येणार आहे, असं म्हणत 'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे . 
     

दरम्यान प्रिया बेर्डे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. एक धागा, आम्ही तिघी या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. प्रिया बेर्डे या अभिनेत्री असण्यासोबत निर्मात्यादेखील आहेत. राजकारणातदेखील त्या अॅक्टिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीसोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे


अभिनेत्री प्रिया बेर्डें 'सिंधुताई माझी माई 'मालिकेत साकारणार मुख्य भूमिका