बातम्या

अभिनेत्री श्रेया बुगडे आता झी मराठीवर : श्रेयाचा नवा लुक

Actress Shreya Bugde Now On Zee Marathi


By nisha patil - 10/6/2024 10:14:17 PM
Share This News:



आता 'चला हवा येऊ द्या'  हा कॉमेडी शो बंद झाल्यानंतर आता त्यातील कलाकार आता पुन्हा नव्याने कमबॅक करत आहेत. काही  कलाकारांनी 'झी मराठी'ची साथ सोडत दुसऱ्या चॅनेलवरील मालिका, शोमध्ये काम करण्यास  सुरुवात केली आहे.

भारत गणेशपुरे यांनी 'झी मराठी'वरील 'शिवा' मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता श्रेया बुगडेही कमबॅक करत आहे. चला हवा येऊ द्यानंतर श्रेया बुगडे काय करणार, याची चर्चा सुरू होती. आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. श्रेया बुगडे आता 'झी मराठी'वरच कमबॅक करत आहे. त्याशिवाय, अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे नव्या भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे.छोट्या पडद्यावर टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे.

अधिकाधिक प्रेक्षकांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी नव्या मालिका, शो सुरू करण्यात येत आहे. तर, सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवा ट्विस्ट येत आहे. झी मराठी वाहिनीवर आता नवा रिएल्टी शो सुरू होणार आहे.  'ड्रामा ज्युनियर्स' या नव्या रिएल्टी शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे कमबॅक करत आहे. श्रेया या शोची होस्ट असणार आहे. त्यामुळे श्रेयाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.


अभिनेत्री श्रेया बुगडे आता झी मराठीवर : श्रेयाचा नवा लुक