बातम्या

वेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्यात ही गोष्ट टाका

Add this to coconut water for fast weight loss


By nisha patil - 9/14/2023 7:25:03 AM
Share This News:



 आजकालच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या कॉमन झाली आहे. तासंतास ऑफिसमध्ये बसणं आणि शारीरिक हालचाल कमी होणं यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि चांगली जीवनशैली महत्वाची आहे.

खासकरून सकाळचं रूटीन आणि सकाळी काय पिता हे फार महत्वाचं ठरतं. जर तुम्ही सकाळी एक हेल्दी ड्रिंक घ्याल तर वजन वेगाने कमी होऊ शकतं.

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक हेल्दी मॉर्निंग ड्रिंकचा ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात नारळ पाण्याने करू शकता. चांगले परिणां मिळवण्यासाठी तुम्ही त्यात थोडे सब्जाच्या बिया टाकून प्या.

एक ग्लास नारळ पाण्यात केवळ 46 कॅलरी आणि 9 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्याशिवाय यात इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसारखे आवश्यक पोषक तत्वही असतात. जे शरीराला हायड्रेटेड आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात.

सकाळी नारळ पाणी पिण्याचे फायदे

मेटाबॉलिज्म होतं बूस्ट

नारळ पाण्यात लॉरिक अॅसिड असतं. हे एकप्रकारचं फॅटी अॅसिड असतं. जे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतं. मेटाबॉलिज्म वाढल्याने शरीर कॅलरी अधिक जास्त बर्न करतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

इम्यूनिटी वाढते

नारळ पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्वही असतात. जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. हे फ्री रॅडिकल्स शरीराला नुकसान पोहोचवू शकतात आणि अनेक आजारांचे कारणही ठरू शकतात. अशात नारळ पाण्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट शरीर निरोगी ठेवण्यास आणि इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतात.

पचनक्रिया सुधारते

नारळ पाण्यात फायबर असतं. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. फायबर पचनाची क्रिया हळू करतं आणि बद्धकोष्ठता रोखण्यासही मदत करतं.

हृदयासाठी चांगलं

नारळ पाण्यात पोटॅशिअमही असतं. हे एक महत्वाचं मिनरल आहे. जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमने ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.


वेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्यात ही गोष्ट टाका