बातम्या
फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान
By nisha patil - 9/12/2023 7:18:58 AM
Share This News:
फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबट-गोड फळे चवीला चांगली असतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फळे खायला आवडतात. काहीजण मीठ घालून फळे खातात तर काही रस बनवून. फळांचे छोटे तुकडे करून त्यावर मीठ टाकून ते चवीने खाल्ले जातात, पण असे केल्याने आरोग्याची हानी होऊ शकते. फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात
१. हाय सोडियम
फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. अशा प्रकारे मीठ खाल्ल्याने मिठाचे प्रमाण वाढू शकते. अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात
२. किडनीची समस्या
जास्त मीठ खाणे किडनीसाठी अजिबात चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनीमध्ये समस्या निर्माण होतात. आपल्याला किडनीचा आजार असला तरी आपण काही फळे खातो, त्यात मीठ टाकून खाल्ल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. किडनीचे आजार असल्यास अन्नातील मिठाचे प्रमाणही कमी करावे.
३. ब्लोटगची समस्या
जास्त सोडियममुळे शरीरात वॉटर रिटेंशनचा धोका वाढतो. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. जास्त सोडियममुळे, शरीर डिटॉक्स होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
४. न्यूट्रिएंटसची कमतरता
फळावर मिठ टाकून खाल्ल्याने फळातील संपूर्ण पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.
मीठ टाकल्याने फळांमधून पाणी बाहेर येते आणि काही प्रमाणात पोषणही कमी होते.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही.
फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान
|