बातम्या
वादग्रस्त IAS पूजा खेडकर च्या अडचणीत आणखी भर
By nisha patil - 7/13/2024 12:20:55 PM
Share This News:
सध्या पुण्यातील गल्ल्यांपासून देश पातळीवर कोट्यवधींच्या संपत्तीने चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे.पूजा खेडकर यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. केवळ पूजा खेडकरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील अनेक कारनामे आणि अरेरावी संदर्भातील प्रकार समोर आलं आहे. खासगी गाडीवर लाल दिव्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर कब्जापर्यंत आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत.
पूजा खेडकर प्रकरणी सादर केलेले दस्तावेजांची तपासणी एका सदस्य समिती मार्फत केली जाणार आहे.वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता पुन्हा नव्याने वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणातील सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी आता तपास समिती मार्फत होणार आहे. नॉन क्रिमिनल आणि मेडिकल दृष्टी दोष चाचणी कोणी केली होती, ज्या रहिवासी भागातून जे प्रमाणपत्र देण्यात आलं त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवार किंवा त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते.
पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी सदस्य समिती नेमली असून त्या प्रकरणाची सखोल चौकशी ही समिती सध्या करत आहेत. पूजा खेडकर यांनी सादर केलेले प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची तपासणी ज्यामध्ये मेडिकल दृष्टीदोष चाचणी रिपोर्ट आणि नॉन क्रिमिनल इत्यादी कागदपत्रे ज्या भागातून देण्यात आले आहे त्या त्या संबंधित विभागाची चौकशी केली जाणार आहे. मात्र आज शनिवार आणि उद्या रविवार आल्याने ही कारवाई सोमवार किंवा मंगळवारी केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या कारवाईत काही दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
वादग्रस्त IAS पूजा खेडकर च्या अडचणीत आणखी भर
|