बातम्या

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरची सगळीकडे चर्चा..

Aditya Thackerays birthday banner is being discussed everywhere


By nisha patil - 6/14/2024 8:16:05 PM
Share This News:



 युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा झाला त्यामुळे राज्यभरासह अमरावतीच्या बडनेरा विधानसभेतही आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र या बॅनरवर लिहाण्यात आलेला मजकूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणांना डिवचत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्याकडून लावण्यात आले आहे. राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली. असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आलाय.


आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरची सगळीकडे चर्चा..