बातम्या

आदित्य ठाकरे चा सरकारवर गंभीर आरोप

Aditya Thackerays serious accusation against the government


By nisha patil - 11/18/2023 6:25:53 PM
Share This News:



  डिलाइ रोड  ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सह पदाधिकाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आला एन एम जोशी पोलीस स्टेशन  यथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंट कडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला 

आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले असा आरोप ठाकरे गटाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय तसेच दोन्ही पालकमंत्र्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी  त्यांनी केली  दरम्यान डिलाई रोड. उड्डाण पुलाचे बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला  मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिले


आदित्य ठाकरे चा सरकारवर गंभीर आरोप