बातम्या

विमानतळ भूसंपादनासाठी प्रशासनाची प्रक्रिया सुरू

Administration process for airport land acquisition started


By nisha patil - 7/15/2023 6:48:24 PM
Share This News:



कोल्हापुरातील विमानतळ विस्तारीकरणासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे येत्या मंगळवार पर्यंत राजपत्राद्वारे याची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे सध्या विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 एकर जागेची संपादन प्रक्रिया सुरू आहे प्रचलित भूसंपादन कायद्यानुसार 13 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. 64 एकर पैकी 32 एकर जमिनीचे संपादन थेट खाजगी वाटाघाटीने करण्यात आले आहे मात्र मोबदल्यावरून उर्वरित जमिनीची खाजगी वाटाघाटी द्वारे संपादन झालेले नाही यामुळे जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिनियम 2013 नुसार संपादनाचा निर्णय घेतलाय. येत्या डिसेंबर अखेर संपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपादन प्रक्रिये बाबत चर्चा केली.


विमानतळ भूसंपादनासाठी प्रशासनाची प्रक्रिया सुरू