बातम्या
गोहत्या व अवैद्य वाहतुकीबाबत बाबत प्रशासनाने दक्ष रहावे :- बजरंग दल..
By nisha patil - 6/14/2024 8:10:05 PM
Share This News:
गाय ही हिंदूंकरता अत्यंत पवित्र स्थानी आहे. गोरक्षणाकरता हिंदु कायमच कटाक्ष पणे सर्वत्र अहोरात्र लक्ष ठेवून असतो .आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो.मात्र संपूर्ण हिंदुस्थान मध्ये च विविध ठिकाणी या श्रद्धांस्थान वर वेळोवेळी समाजा तून कोणत्या ना कोणत्या प्रकारे घात होत आले आहेत..याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन गोहत्या व अवद्य वाहतूकीबाबत दक्ष रहावे अशा अशायाचे निवेदन बजरंग दल तर्फे देण्यात आले..
महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थान मध्ये प्रचंड प्रमाणात निष्पाप पवित्र गाई, बैल, वासरे यांची चोरटी तस्करी होते. धर्मांध गायींच्या प्रचंड सामूहिक कत्तली करतात. हिंदुस्थानात धर्मांध हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गायींच्या मुद्दाम कत्तली करतात. काही सणाचे औचित्य साधून मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान-सहान गावातही गाई-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. सरकार खाटकांना अटक करण्याचे धाडस दाखवत नाही. कायद्याने गोहत्या बंदी जिथे आहे, तिथेही हिंदुच्या डोळ्यांसमोर गोमांसाचा बाजार चालू असतो. मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात सहस्त्राे कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे.
आपल्या भागात कोल्हापूर सांगली, मिरज,वडगाव इचलकरंजी निपाणी इत्यादी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैद्य वाहतूक चालू असते सोबतच गो रक्षकावर ही हल्ले वाढले आहेत..गायीची दररोज होत असलेली विटंबना, तस्करी,कत्तल, बेकायदेशीर पणे होत असलेली त्यांची वाहतूक या बाबींनकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष्य देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून या निवेदना चा घाट घात घातला आहे. बजरंग दल ची टोळी कायदेशीर मार्गाने प्रशासनास योग्य ते सहकार्य करण्यास नेहमीच तयार आहे..
निवेदन प्रसंगी शिवजी व्यास, रवीकिरण हुक्कीरेकर,अमोल शिरगुप्पे,अमित पाटील सर्जेराव कुंभार,दत्तात्रय डांगरे,उमेश संगावकर,राजेश बुग्याड आदी बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते..
गोहत्या व अवैद्य वाहतुकीबाबत बाबत प्रशासनाने दक्ष रहावे :- बजरंग दल..
|