बातम्या
समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त 18 शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश सुरु
By nisha patil - 8/7/2024 5:47:18 PM
Share This News:
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील मुला-मुलींच्या 18 शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 वर्षातील वसतिगृह प्रवेशासाठी दि. 10 जुलै 2024 पर्यंत अर्ज जमा करावयाचे आहेत. त्यानुसार पहिली प्रवेश निवड यादी अनुक्रमे दि. 12 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेश निश्चिती दि. 18 जुलै 2024 रोजी राहील. त्यानंतर रिक्त जागेवर दुस-या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निवड दि. 19 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादीनुसार विद्यार्थ्यांची वसतिगृहातील प्रवेश निश्चिती दिनांक 24 जुलै 2024 रोजी राहील.
इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एम.ए., एम.कॉम., एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे. त्यानुसार पहिली प्रवेश निवड यादी अनुक्रमे दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याचा वसतिगृहातील प्रवेश निश्चितीचा दिनांक 12 ऑगस्ट 2024 राहील. त्यानंतर रिक्त जागेवर दुस-या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादीनुसार विद्यार्थ्याची वसतिगृहातील प्रवेश निश्चिती दि. 22 ऑगस्ट 2024 रोजी राहील.
सन 2024-25 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच प्रत्येक सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय व शासकीय वसतिगृहामधून अर्ज विनामुल्य विद्यार्थ्यांना, पालकांना वितरीत करण्यात येत आहे. तसेच प्रवेश अर्जाची पीडीएफ आवश्यक त्या सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन्ही वेळेचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र.0231-2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त 18 शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश सुरु
|