बातम्या
गृहमंत्र्यानंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट..?
By nisha patil - 3/20/2024 4:39:29 PM
Share This News:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकारणात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत.राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. यांच्यात बैठक देखील झाली. अमित शाहांसोबतच्या बैठकीला विनोद तावडेंसह अमित ठाकरेही उपस्थित होते. यामुळे राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दिल्लीतील राजकीय बैठकीनंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
दिल्लीतील राजकीय बैठकीनंतर आता राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर आली आहे .दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेबाबत चर्चेची शक्यता आहे. दोन जागा मनसेला सोडण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. तसंच या बैठकीत सभा कुठे घ्यायच्या याबाबतही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलं आहे
गृहमंत्र्यानंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट..?
|