बातम्या

संभाजीनगरनंतर आता पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ

After Sambhajinagar now there is a big excitement in Palghar district


By nisha patil - 10/23/2023 4:24:13 PM
Share This News:



संभाजीनगरनंतर आता पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ 

मोखाडा तालुक्यातील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश

ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त

पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. या
कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोजच या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. ललित पाटीलला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्यानंतर ड्रग्ज प्रकरण तपासाला वेग आला आहे. सोलापूर, नाशिक, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती. 
         

त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेने ही गुप्त कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे.  राज्यात होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले असतील हे म्हणायला काही हरकत नाही या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  
   

या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.  एका फार्म हाऊसवर  हा कारखाना चालू होता. या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आले आहे.


संभाजीनगरनंतर आता पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ