बातम्या
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी बाबत नार्वेकरांचा काय असणार निर्णय...?
By nisha patil - 1/13/2024 4:21:46 PM
Share This News:
गेल्या काही दिवसांपासून आमदार अपात्रतेच्या निकालावर राज्यासह देशात जोरदार चर्चा करण्यात येत होत्या. मात्र विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल देत कोणत्याही गटाच्या आमदारांना त्यांनी अपात्र ठरवले तर नाहीच तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचे सांगितल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी काय निर्णय देणार याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालावर बोलताना त्यांनी अनेक गोष्टींही यावेळी स्पष्ट केल्या आहेत.
ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुद्दे वेगळे आहेत, त्यामुळे तेही आधी तपासावे लागतील. हा निर्णय देतानाही निकष तपासूनच निर्णय द्यावा लागणार आहे. त्यामुळे काही निकष बदलणार नाहीत व कायदाही बदलणार नाहीत. प्रत्येक केसचे महत्व आणि विषय वेगळे असू शकतात. त्यामुळे त्या हो नियमानुसारच नियम लागू करावाल लागतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी बाबत नार्वेकरांचा काय असणार निर्णय...?
|