बातम्या

अखेर आता वंचितचा ही शाहू छत्रपतींना पाठिंबा...!

After all this is the support of Shahu Chhatrapati of Vanchit


By nisha patil - 3/25/2024 5:04:27 PM
Share This News:



एकीकडे महायुतीकडून कोल्हापूर च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी संजय मंडलिक आणि समरजीत सिंह घाटगे यांच्या ही नावाची चर्चा सुरू होती  यातून आज महायुती कडून विद्यमान खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना उमेदवारी कडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे..

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट या महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे..

त्यातच आता वंचित कडूनही शाहू महाराजांना पाठिंबा देण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे ..
तर शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याबद्दल कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले....

शाहू महाराजांना महा विकास आघाडी कडून सर्वप्रथम उमेदवारी निश्चित झाल्याने राजकीय लगबगी सुरू झाले आहेत 

आणि आजच संजय मंडलिक त्यांना महायुतीकडून ग्रीन सिगनल मिळाल्याने भाजप कडून राष्ट्रवादी अजित पवार गट मी शिवसेना शिंदे गट यांच्याकडून प्रखर हालचाली सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत..


अखेर आता वंचितचा ही शाहू छत्रपतींना पाठिंबा...!