बातम्या

लाडकी बहिण भाऊ नंतर आता माझा लाडका घोडा; जितेंद्र आव्हाड

After beloved sister brother now my beloved horse


By nisha patil - 3/8/2024 2:36:13 PM
Share This News:



सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे… जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला     मुंबई पोलीस विभागात आता अश्वदल सुरु होणार असल्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकाला खोचक टोला मारला. 'माझा लाडका घोडा' यावरुन त्यांचे ट्वीट आता चर्चेत आले आहे. काय म्हटले आव्हाड राज्यात सध्या लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी हा प्रयोग होत असल्याचा घणाघात विरोधक करत आहे. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्वीटने अजून मुद्दा उभा केला आहे. मुंबई पोलीस विभागात अश्वदल सुरु होणार असल्याचे एका वृत्ताचा आधार घेत, त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांचे ट्वीट सध्या चर्चेत आले आहे.
 

मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार! पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील. जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत? निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा ? ही नवीन योजना आहे, ” माझा लाडका घोडा” आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील; तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच!!


लाडकी बहिण भाऊ नंतर आता माझा लाडका घोडा; जितेंद्र आव्हाड