बातम्या

आंबादास दाणवे यांच्या कडे तक्रारीनंतर सुटला राजारामपुरीतील पाणीप्रश्न

After complaint to Ambadas Danve Water problem in Rajarampuri solved


By nisha patil - 10/2/2024 1:38:44 PM
Share This News:



आंबादास दाणवे यांच्या कडे तक्रारीनंतर सुटला राजारामपुरीतील पाणीप्रश्न

शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली होती तक्रार

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : शहरातील राजारामपुरीत काही ल्ल्यांमध्ये गेले तीन महिने पाणी नव्हते. त्याविषयी महापालिकेच्या बाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र काहीच करक पडला नाही. अखेर विरोधी मक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात शिवसेना महिला आघाडीच्या बाहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या तृत्वाखाली नागरिकांनी तक्रार दाखल कली. त्यानंतर महापालिका यंत्रणा हालली. अधिकारी कामाला लागले आणि शुक्रवारी पूर्ण क्षमतेने पाणी सुरवठा झाला. राजारामपुरीत ८ व्या व ९ व्या ल्लीत सुमारे ४० पेक्षा जास्त अपार्टमेंट आहेत. यात संचयनी पार्क अपार्टमेंट, रजपूत कॉम्प्लेक्स, गुणगौरव अपार्टमेंट, चारुशीला अपार्टमेंट, गजानन अपार्टमेंटस यासह इतर अपार्टमेंटचा समावेश आहे. नळाला पाणी येत असल्याने नागरिकांना टँकरने पाणी 

विकत घ्यावे लागते; परंतु रीतसर महिन्याला पाणी बिलही भरावे लागते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेला निवेदने देऊन आंदोलनेही करूनही फरक पडला नव्हता. विरोधी पक्षनेते दानवे यांच्याकडे प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी तक्रार केली. दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांना २४ तासांत  पाणीपुरवठा सुरळीत करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंत यंत्रणा गतिमान झाली. व्हॉल्व्हसह इत दुरुस्त्या आणि पाईपलाईनची कामे करण्यात आली. दरम्यान राजारामपुरीतील ९ व्या गल्लीतील अनेक घरांमध्ये पावसाळ्यात पाणी घुसते. त्याठिकाणी स्ट्रॉम वॉटरचे काम करण्याचे आदेशही विरोधी पक्षनेता दानवे यांनी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना दिले.


आंबादास दाणवे यांच्या कडे तक्रारीनंतर सुटला राजारामपुरीतील पाणीप्रश्न