बातम्या

बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेने घेतला गळफास

After giving birth to the baby the woman hanged herself


By nisha patil - 6/19/2023 5:07:13 PM
Share This News:



उत्तर प्रदेशची राजधानी युक्रेनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घ. या दरम्यान लखनऊमध्ये तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येच्या घटनेने परीसरात एकच खळबळ माजली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या सेक्टर Iपरीसरात राहणाऱ्या 27 वर्षीय ओकसाना ममचरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत महिला ही मुळची युक्रेनची रहिवासी होती. मात्र तीनच महिन्यांपुर्वी ओकसाना ममचर तिच्या सासरी आली होती. सासरी ती सासू रूथ आणि ननंद रूफीना व युहाना यांच्यासोबत राहत होती. तर ओकसानाचे पती युक्रेनच्या एका युनिवर्सिटीच पीएचडी करत आहेत.गेल्या 14 जूनला ओकसानाने एका प्रायव्हेट रूग्णालयात एका बाळाला जन्म दिला होता. यावेळी ओकसानाची नॉर्मल डिलीव्हरी झाली होती. या डिलिव्हरीनंतर ओकसानाने तिच्या युक्रेनमध्ये राहत असलेल्या नवऱ्याशी व्हॉट्सअॅप चॅटवर बातचीत केली होती. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये, ओकसानाने प्रसुतीनंतर शरीर विद्रूप झाल्याची चिंता व्यक्त केली होती. माझे शरीर विद्रुप झाले आहे. तसेच माझे शरीर पहिल्यासारखे न राहिल्याने मला नोकरी मिळणार आहे, अशी भीती तिला सतावत होती. या भीतीतून महिलेने सुसाईड नोट लिहले होते. हे सुसाईड नोट लिहल्यानंतर महिलेने आत्महत्या केली होती. या दरम्यान दुसऱ्या खोलीत तिचं नवजात बाळ झोपलं होतं.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली होती. या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या घटनेची माहिती पोलिसांनी युक्रेनमध्ये राहत असलेल्या महिलेच्या पतीला दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. आता या घटनेत आत्महत्येचे ठोस कारण काय समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेने घेतला गळफास