बातम्या
राजकारणाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौतम गंभीर आपल्या कामाप्रती आक्रमक,
By nisha patil - 4/3/2024 7:56:47 PM
Share This News:
मुंबई : गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्लीतून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आला होता. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याने राजकारणाला रामराम ठोकला आहे. आता तो क्रिकेटमधील नवीन कामगिरीकडे लक्ष ठेऊन आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर म्हणून त्याची नियुक्ती करण्अयात आली आहे. तसेच स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये त्याने भाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलं. आता केकेआरला स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता स्टार स्पोर्टशी बोलताना गंभीरने सांगितलं की, आयपीएल माझ्यासाठी एक सीरियस क्रिकेट आहे. मी हे खूप गांभीर्याने घेतो.
गौतम गंभीरने सांगितलं की, ‘सुरुवातीलाच मी हे स्पष्ट केलं आहे की, माझ्यासाठी आयपीएल एक सीरियस क्रिकेट स्पर्धा आहे. बॉलिवूड, वैयक्तिक अजेंडा किंवा सामन्यानंतर होणाऱ्या पार्ट्यांबाबत नाही.हे स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याबद्दल आहे. म्हणून जगातील सर्वात कठीण लीग आहे. तसेच क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ आहे. ही क्रिकेट लीग अन्य क्रिकेट लीगपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जव आहे. जर फेमस फ्रेंचायसी बनायचं असेल तर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.’, असं गौतम गंभीरने सांगितलं.
राजकारणाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौतम गंभीर आपल्या कामाप्रती आक्रमक,
|