बातम्या

महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्ली भाजपमध्ये खलबत् सुरू...

After the defeat in Maharashtra now there is chaos in Delhi BJP


By nisha patil - 6/18/2024 2:04:32 PM
Share This News:



 महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्ली भाजपमध्ये खलबतं सुरू होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत उद्या महाराष्ट्र भाजप कोअर कमिटी दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहे. अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी बीएल संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीसोबत दिल्लीत बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत चर्चा होणार आहे. सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय संघटनेचं बळकटीकरण होणार नाही, यावर अजूनही देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.


महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्ली भाजपमध्ये खलबत् सुरू...