बातम्या

७ व्या दिवशी उपोषण मागे,विभागीय कार्यालया समोर मनसेचा जल्लोश

After the fast on the 7th day


By nisha patil - 1/18/2024 4:56:40 PM
Share This News:



अखेर मनसे आंदोलनामुळे  शेतकऱ्यांना न्याय मिळणार..

७ व्या दिवशी उपोषण मागे,विभागीय कार्यालया समोर  मनसेचा जल्लोश

 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार यापेक्षा मोठा आंनद नाही - राजु दिंडोर्ले
              
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर  शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली पदाधिकारी  गेले ६ दिवस आमरण उपोषण सुरू होते.

 

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी मनसेच्या वतीने जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करून न्याय मिळवून दिला असल्याने मनसेच्या बद्दल लाखो शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केले.
या प्रश्नी आज मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार सचिव राजेशकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी भेट घेऊन यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करून निवेदन दिले होते.
     

 यावेळी सहकार सचिव राजेशकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले की मनसेच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली असून खास बाब म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील जे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्या सर्व शेतकरी ,माजी सैनिक याना अनुदान देण्यात येणार असून तशी शिफारस करून प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला आहे. येत्या आठ दिवसामध्ये शासन निर्णय करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील असे सांगितले.
     

तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी धार्मिक , विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबधक धायगुडे, यांच्यासह मनसे शहराध्यक्ष राजू  दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते . 
 

सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेअंती मंत्रालयातील वरील वरिष्ठ अधिकारी व  मनसे  नेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार  उपोषणकर्त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या मागण्यांचे  लेखी पत्र देऊन उपोषण कर्त्यांना सरबत देऊन जिल्हाधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी व उपोषणाला बसलेले पदाधिकारी
शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले,जिल्हा सचिव प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष   राजू पाटील,अभिजीत पाटील,जिल्हा सचिव यतिन होरणे,शेतकरी - सचिन पाटील,यांचे उपोषण सोडवण्यासाठीमनसे नेते  दिलीप  धोत्रे, प्रदेश सरचिटणीस बाळाभाऊ शेंडगे,संपर्क अध्यक्ष  जयराज लांडगे, शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, जिल्हा संघटक पुंडलिक जाधव, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, यांच्यासह राज्य पातळीवरील वरिष्ठ पदाधिकारी कोल्हापुरात येत असून कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


७ व्या दिवशी उपोषण मागे,विभागीय कार्यालया समोर मनसेचा जल्लोश