बातम्या

निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर नरेंद्र मोदींचा स्वर बदलला

After the first two phases of the election


By nisha patil - 9/5/2024 7:22:01 PM
Share This News:



  देशातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान हे पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणार आहे. कारण निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर नरेंद्र मोदी  यांनी आपला स्वर बदलला आहे. त्यांनी मुस्लीम समाजाचा उघडपणे उल्लेख केला. त्यांना आता धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते, असे वाटत असावे. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात राहतील तसतसे त्यांचे स्थान हे संकटात जातंय, अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये असावी, असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते गुरुवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि एमआयएमला 1 अशा सहा जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. आता असं दिसतंय, आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 वर जाईल. लोकांना बदल हवा आहे. लोकांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला समर्थन मिळत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी 17 मे रोजी मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबतही भाष्य केले. याबाबत त्यांनी म्हटले की, मोदी साहेबांना कोणाची ना कोणाची मदत हवी. त्यामधून मोदींचा आत्मविश्वास दिसून येतो, असे शरद पवार यांनी सांगितले.


निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर नरेंद्र मोदींचा स्वर बदलला