बातम्या

दुपारच्या झोपेमुळे ह्रदय विकाराचा धोका कमी! ‘हे’ आहेत ४ फायदे

Afternoon sleep reduces the risk of heart disease


By nisha patil - 2/23/2024 8:44:29 AM
Share This News:



दुपारी झोप घेणे वाईट असल्याचे अनेकजण सांगतात. काही लोक इच्छा असूनही कामामुळे दुपारची झोप घेऊ शकत नाहीत. दुपारी जेवल्यानंतर काही व्यक्तींना खुप आळस येतो. परंतु, तुम्ही जर दुपारी नियमित झोपत असाल तर ही आनंदाची बातमी आहे. दुपारी झोपणे हे शरिरासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे युनिवर्सिटी ऑफ पेनसिलवेनियाचे सायकलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर फिलिप यांनी म्हटले आहे.

हे आहेत फायदे
१. दुपारच्या वामकुशीमुळे आळस दूर होतो.
२. ऊर्जाही वाढवते.
३. रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
४. ह्रदयाचे आरोग्यही चांगले राखले जाते.

हे लक्षात ठेवा
१. पंधरा ते तीस मिनिटांपर्यंतची वामकुशी आळस दूर करण्यासाठी पुरेशी असते.
२. मानसिक थकवा असल्यास ९० मिनिटे झोप घ्यावी.
३. झोपेतून अचानक जागे झालात तर तुम्हाला जास्त थकवा जाणवू लागतो.
४. वर्कआउटनंतर लगेचच झोपणे शरिरासाठी हानिकारक ठरते.
५. वर्कआउट केल्यनंतर कमीत कमी २ तासांनंतरच झोपावे.
६. दुपारी झोपण्याची गरज वाटत नसेल तर उगाच झोपू नका.
७. प्रत्येकालाच दुपारच्या झोपेचा फायदा होत नाही.


दुपारच्या झोपेमुळे ह्रदय विकाराचा धोका कमी! ‘हे’ आहेत ४ फायदे