बातम्या
कोल्हापुरात अनधिकृत रेल्वे तिकीट विक्रीप्रकरणी एजंट अटकेत
By nisha patil - 2/22/2025 6:06:48 PM
Share This News:
कोल्हापुरात अनधिकृत रेल्वे तिकीट विक्रीप्रकरणी एजंट अटकेत
कोल्हापूर, – कोल्हापूर रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने शिवाजी पेठ येथे कारवाई करत एका अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटला अटक केली आहे. या कारवाईत एकूण 63,764 रुपये किंमतीच्या 22 रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली.
RPF निरीक्षक विजय शंकर मांझी, हेडकॉन्स्टेबल रमेश नारिंगकर, संजय कांबळे आणि कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपीकडे तिकिटांची अनधिकृत विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.
या प्रकरणी रेल्वे अधिनियम कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निरीक्षक विजय शंकर मांझी करत आहेत.
कोल्हापुरात अनधिकृत रेल्वे तिकीट विक्रीप्रकरणी एजंट अटकेत
|