बातम्या
एस एस ट्रेडर्स कंपनीच्या एजंटनी कोट्यावधी रुपयांची केली फसवणूक
By nisha patil - 8/8/2023 5:20:46 PM
Share This News:
एस एस ट्रेडर्स कंपनीच्या एजंटनी कोट्यावधी रुपयांची केली फसवणूक
एस एस ट्रेडर्स कंपनी कंपनीमध्ये कमिशन एजंट म्हणून काम करत असलेल्या पाचशेहून अधिक एजंट आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या रडावर आले आहेत कंपनीकडून एजंट ना मिळालेले कमिशन दुचाकी कार प्लेट तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा करावेत अशा सूचना तपास अधिकाऱ्यांनी एजंट ना दिल्या अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला
एस एसट्रेडर्स कंपनीच्या एजंटांनी हजारो गुंतवणूकदारकांच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली गुंतवणुकीमध्ये फसवून एजंटांनी लाखो रुपये मिळवले ती मालमत्ता जप्त केली जाणार असून कंपनीतून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाचशे एजंटांची यादी केली मालमत्ता लप वण्याचा किंवा दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केल्यास एजंटांवर कारवाई करण्यात येईल असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले
या एजंटामध्ये प्रमुख संशयित रोहित सिंग सुभेदार याने सव्वा कोटी रुपयांची आलिशान कार मुंबईमधील एका कार डीलर ला विकले ती कार सध्या मुंबईतील शोरूम मध्ये विक्रीसाठी ठेवली असून तिची किंमत 74 लाख रुपये सांगण्यात येत आहे ही कार जप्त करण्याचा प्रयत्न आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे
एस एस ट्रेडर्स कंपनीच्या एजंटनी कोट्यावधी रुपयांची केली फसवणूक
|