बातम्या

कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक

Aggressive Marathas in Kolhapur


By nisha patil - 10/13/2023 4:59:20 PM
Share This News:



भुजबळांनी जरांगेच्या  सभेच्या खर्चाची चौकशी करण्याची केली होती मागणी

यावर कोल्हापूर मराठा समाज आक्रमक 

शहाणे वा भुजबळ काढू नका मराठ्यांची कळ अशी केली घोषणा बाजी 

जरांगे पाटील यांच्या शनिवारी होणाऱ्या सभेतील खर्चावर भाष्य करणारे मंत्री भुजबळ यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी चौकात निषेध करण्यात आला मराठ्यांचा आव्हान करणाऱ्या भुजबळाचा अधिकार असो दोन हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या भुजबळांचं करायचं काय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून व तोंडाला काळे फासून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला

स्वतः दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज रंगे पाटील यांच्या सभेच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करून मराठा समाजाचे आव्हान केला आहे दुसऱ्यांचे तळवे साठवून सत्तेत बसणाऱ्या भुजबळ यांनी मराठ्यांची कळ काढू नये ते त्यांना महागात पडेल असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी दिला. 
    मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांची सभा व ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय मंत्री असणाऱ्या भुजबळ यांनी अशा प्रकारचे व्यक्तव्य करून कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केले आहे.  त्यांचावर  गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठे यांच्याकडे केली आहे..


कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक