बातम्या

शेतकरी संघटना आंदोलन अंकुश आक्रमक

Aggressive curbs on farmers union agitation


By nisha patil - 9/25/2023 5:39:53 PM
Share This News:



दुसरा हप्ता  500 रुपये द्या  अन्यथा  आंदोलन th

गुरुदत्त कारखान्यांने येणारा ऊस हंगाम शेतकऱ्यांच्या हातात आहे हे ध्यानात ठेवावं....आंदोलन अंकुश

दुसरा हप्ता 500 रु. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी

अन्यथा 29 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या गेट समोर करणार धरणेआंदोलन

शेतकरी संघटना आंदोलन अंकुश आक्रमक

 

साखर कारखान्यांना मागील दोन हंगामात वाढलेल्या साखर दरामुळे व इथेनॉल सह उप पदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे  मोठा फायदा झाला आहे.
या फायद्यातील वाटा म्हणून दुसरा हप्ता 500 रु. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी यापूर्वी कारखान्याकडे केली होती पण शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून कारखान्याकडे पैसे  उपलब्धअसूनही स शेतकऱ्यांना दुसरा हप्ता 500रु दिला नाही. आज शेतकरी अडचणीत आहे, उस शेती परवडत नाही,निव्वळ एफ आर पी म्हणजे उसाचा दर नव्हे

त्यामुळे गुरुदत्त कारखाण्याने दुसरा हप्ता 500रुपये तात्काळ द्यावा अन्यथा  29 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या गेट समोर धरणेआंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यासाठी उत्पादक शेतकरी कारखान्यावर गेले असता गुरुदत्त शुगरचे एमडी राहुल घाटगे हे कारखाना कार्यस्थळावर हजर असताना सुद्धा त्यांनी जाणून बुजून शेतकऱ्यांची भेट घेण्याचे टाळले.
अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या अडीअडचणी समजावून घेण्याची हिम्मत कारखानदारांच्या मध्ये नाहीये .फक्त शेतकर्याना लुटुन याचं वैभव वाढवण्यात यानां स्वारस्य आहे.पण येणारा काळ शेतकऱ्यांचा आहे हे ध्यानात ठेवावं त्यामुळे कारखान्याने500 रुपयाचा दूसरा हप्ता तात्काळ जाहीर करावा अन्यथा शुक्रवार दिनांक 29 पासून कारखाना गेटवर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

 


शेतकरी संघटना आंदोलन अंकुश आक्रमक