इचलकरंजी शहरात अंगात भूत असल्याचे सांगत अघोरी कृत्य
By nisha patil - 6/14/2023 4:49:41 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी इचलकरंजी शहरात अंगात भूत असल्याचे सांगत अघोरी कृत्य केल्याची घटना घडली आहे. सासरी येण्यासाठी 40 तोळे सोने व फॉर्च्युनर गाडीची मागणी करत आणि 61 तोळे सोने व 10 लाखाची फसवणूक करुन घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देऊन तोडफोड केल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन पतीसह दहा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये असगर सलीम केरुरे, नुरजहाँ सलीम केरुरे, सलीम पापालाल केरुरे, शहारुख सलीम केरुरे, आफरोज शहारुख केरुरे हिना सलीम सनदे, शबाना फकिर, लुकमान फकीर , मौलाना जावेद व मुजावर यांचा समावेश आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास स.पो.नि रोहन पाटील करत आहेत. विवाह झाल्यापासून फिर्यादी महिलेचा सासरच्या लोकांकडून तुला घरातील कामे करण्यासाठी आणले आहे असे म्हणत शारिरिक व मानसिक छळ केला जात होता. त्याचबरोबर तिच्या अंगात भूत आहे असे म्हणत तिला गडहिंग्लज येथील मौलाना जावेद आणि करवेश येथील दर्ग्यातील मुजावर यांच्याकडे नेऊन अघोरी कृत्य केले. लग्नात दिलेले 61 तोळे सोने आणि 10 लाख रुपये काढून घेतले. मुलीला नांदवायचे असेल तर 40 तोळे सोने व फॉर्च्युनर गाडी देण्याची मागणी केली. पैसे व सोने देण्यास सासरच्यांनी नकार दिला. त्याचबरोर 2 जून रोजी घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील साहित्याची तोडफोड करत व पडदे जाळत नुकसान करण्यासह हातातील अंगठी काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे . पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजी शहरात अंगात भूत असल्याचे सांगत अघोरी कृत्य
|