बातम्या
राज्यात आंदोलन सुरू: जरांगे पाटलांची तब्येत खालावली
By nisha patil - 2/16/2024 1:01:55 PM
Share This News:
राज्यात आंदोलन सुरू: जरांगे पाटलांची तब्येत खालावली
सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच तिथं जरांगे पाटील यांची प्रकृती खाल्यावल्यामुळं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. परभणी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पासून रास्तारोको आंदोलन सुरू आहे, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड नांदेड महामार्गावरील मरडसगाव फाटा येथे शेकडो मराठा बांधवानी गुरा ढोरांसह रास्तारोको आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता वाढता पाठिंबा मिळत आहे.
मरडसगाव,गोपा, नरळद येथील मराठा तरुणांनी हा महामार्ग अडवला असून, जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत इथून न उठण्याचा निर्धार या तरुनांनी केला आहे. या आंदोलनामुळं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर जिल्हाभरात शुक्रवारी मराठा संघटनांच्या वतीने चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातही काही दिवसांपासून जाणवणारी मराठा आरक्षणाची धग आता आणखी तीव्र झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एसटी महामंडळाने जिल्ह्यातील बस सेवा तूर्तास बंद केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच एकही बस रस्त्यावर धावताना दिसली नाही. गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024 ला) जिल्ह्यात दोन बसवर दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, धाराशिव शहरात बंदचा हा तिसरा दिवस असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील शिवाजी चौकात गुरुवारपासूनच मराठा आंदोलक कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहे. तर तुळजापूर ,कळंब, लोहारा, परंडासह उस्मानाबाद शहरात रास्ता रोको करण्यात येणार आहे.
राज्यात आंदोलन सुरू: जरांगे पाटलांची तब्येत खालावली
|