शैक्षणिक
डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड
By nisha patil - 1/29/2025 5:49:47 PM
Share This News:
डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड
तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नम्रता मोहिते व प्रणव जिनगर यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा (गट ब) मध्ये त्यांनी अनुक्रमे १५ व १६ वे स्थान प्राप्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड
|