बातम्या
हुपरी येथे शेती विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न
By nisha patil - 11/1/2025 2:46:35 PM
Share This News:
हुपरी येथे शेती विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न
डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
शेतकऱ्यांना नॅनो खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन
सहकार भारती आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती विकास कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकसित नॅनो खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
नॅनो टेक्नॉलॉजीच्या विकसित ज्ञानो खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याविषयी शेती वकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, सहकार भारतीचे विवेक जुगादे, सौ. वैशालीताई आवाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ईफको लि. पुणेचे वरीष्ठ व्यवस्थापक महादेव पोवार यांनी शेतकऱ्यांना नॅनो खतांच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहकार भारती कोल्हापूर जिल्हा नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यशाळेस अनेक शेतकरी आणि मान्यवर उपस्थित होते.
हुपरी येथे शेती विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न
|