बातम्या
कृषीसह व्यापार, उद्योगांना मिळणार व्यासपीठ...चेतन नरके
By nisha patil - 8/29/2024 7:44:23 PM
Share This News:
केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार विभागांतर्गत ना नफा ना तोटा धर्तीवर ऑनलाईन खरेदी विक्रीसह व्यापार उद्योगला चालना देण्यासाठी 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ओएनडीसी) सुरू केले आहे. सर्वप्रकारचे उद्योग, खाद्य पदार्थ, लहान व्यावसायिक यांना ई-कॉमर्सचे व्यासपीठ यामाध्यमातून खुले होत आहे. यामाध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशात व्यावसाय वाढवण्याची संधी आहे. भारत सरकार, थायलंड आणि सिंगापूर या देशातील प्रतिनिधी ३० ऑगस्टला दिल्ली येथे एकत्र येवून ओएनडीसीबाबत पुढील करार आणि दिशा ठरवणार आहेत. कोल्हापूरचे सुपूत्र डॉ. चेतन नरके थायलंड देशाचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेत सहभागी होत आहेत. ओनडीसीच्या माध्यमातून पारदर्शी आणि खात्रीपूर्वक व्यापार आणि खरेदीची संधी उद्योजक आणि ग्राहक यांना कशी उपलब्ध होईल यावर सखोल चर्चा होणार आहे. अशी माहिती डॉ. चेतन नरके यांनी दिली आहे. कोल्हापुरातील गुळ, कृषी उत्पादने, फळ, दुग्धजन्य पदार्थासह खाद्य पदार्थ तसेच इतर सर्वप्रकारची लहान मोठ्या
उद्योगातील वस्तूंची निर्मिती यांना
आंतराष्ट्रीय व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सिंगापूर येथील नावाजलेली आंतराराष्ट्रीय कंपनी यातील पैसे आणि वस्तूंची देवाण-घेवाण हा महत्वाचा मुद्दा हाताळणार आहे. ओनडीसीला आंतराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून देण्यासह एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रक्रिया दिल्लीतील बैठकीतून सुरू होणार असल्याचे डॉ. चेतन नरके यांनी
सांगितले. थायलंड सरकारतर्फे डॉ. चेतन नरके है प्रतिनिधीत्व करणार आहेत. देशांर्गत वस्तूंना फक्त दोन टक्के इतक्याच वस्तू ई कॉमर्सव्दारे खरेदी-विक्री होतात.
थायलंड आणि सिंगापूरदेशात ही व्याप्ती २० टक्क्यांपर्यंत आहे. आपल्याकडील कृषी आणि दुग्ध व्यवसायाला ओनडीसीच्या माध्यमातून व्यापारासाठी जागतिक व्यासपीठ निर्माण होण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्वाची मानली जाते. गाय आणि म्हशींचे डीएनए टेस्ट करुन योग्य जातीचे जनावरं कसे मिळेल ? जनावरांचे आयुष्यमान, दूध देण्याची क्षमता कळेल. डीएनए टेस्ट कमीत खर्चासह अधिकाधिक अनुदान कसे मिळेल यावरही दिल्ली येथील ३१ ऑगस्ट रोजी थायलंड, चीन आणि भारत देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत होणार असल्याची माहिती डॉ. चेतन नरके यांनी दिली.
कृषीसह व्यापार, उद्योगांना मिळणार व्यासपीठ...चेतन नरके
|