बातम्या

अजित पवार गटातल्या 'या'बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Ajit Pawar group s big leader entry into Thackeray group


By nisha patil - 12/30/2023 3:10:03 PM
Share This News:



अजित पवार गटातल्या 'या'बड्या  नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश 

पुण्यातच उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोठा धक्का

मुंबई : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील ‘मातोश्री’ या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. हजारो समर्थांसह वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत.

* शिवबंधन बांधल्यानंतर वाघेरे म्हणाले…*
अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी वाघेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला. त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आभार मानतो. मी शब्द देतो की, येत्या काळात मी पक्षाच्या प्रसारासाठी मी प्रयत्न करत राहील. लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतो. हे काम पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन, असं वाघेरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत केलं. मातोश्रीत आलेल्या शिवसेनेच्या सर्व वाघांचं स्वागत करतो. वाघेरे म्हणाले, की ते मला भेटल्यावर भावून झाले. पण हा काळ असा आहे की, जे भावूक आहेत. निष्ठावंत आहेत. ते लोक भगव्यासोबत आहेत. माझ्यासोबत आहेत. जे खाऊक आहेत त्यांना खोक्यात घालायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांचं स्वागत करत असतानाच शिंदे गटाला टोला लगावला आहे.


अजित पवार गटातल्या 'या'बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश