बातम्या
अजित पवार म्हणाले, थांबा म्हटलं तर थांबले नाहीत यावर शरद पवारांचं प्रत्युत्तर
By nisha patil - 12/25/2023 7:06:37 PM
Share This News:
अजित पवार म्हणाले, थांबा म्हटलं तर थांबले नाहीत यावर शरद पवारांचं प्रत्युत्तर
शरद पवार यांनी उप मुख्यमंत्री अजित पवारांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलेय. यांना थांबा म्हटलं तर थांबले नाहीत, कुणी 38 व्या वर्षी निर्णय घेतला तर मी 60 व्या वर्षी निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर नव्या लोकांना प्रोत्साहन द्यायची काळजी मी घेतली, याचाच मला आनंद आहे, असे शरद पवारांनी म्हटलेय. पुण्यातील भीमथडी जत्रेमध्ये शरद पवारांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. जत्रेतील विविध स्टॉल्सचा शरद पवारांकडून आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारले असता त्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले, अजित पवार म्हणाले ते खरं आहे, माझं सगळीकडे लक्ष नव्हतं. तिथली जबाबदारी कुणी घ्यावी, तिथल्या लोकांनी ठरवावे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे, हीच भूमिका राहिली. नव्या लोकांना प्रोत्साहन द्यायची काळजी मी घेतली, याचाच मला आनंद आहे.
मागील 10 ते 15 वर्ष झालं बारामतीत मी लक्ष घातलं नाही. मी कधीच तिथं कोणता निर्णय घेतला नाही. नवीन पिढी पुढे येऊन त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असं मला वाटतं. आता तिथल्या त्यांनी सगळ्यांना बरोबर घ्यावं, नावलौकीक वाढेल असे निर्णय घ्यावेत.
तुमच्या बंडात आणि अजित पवारांच्या बंडात काय फरक? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "आमच्या काळात बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायाची. आज कुणी काय केलं असेल, त्याच्याही तक्रार करायची कारण नाही. फक्त पक्ष महत्वाचा आहे. त्याचा संस्थापक कोण राहिलेय? लोकांनी या पक्षाला मोठं केलं. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोरच आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही. असे म्हणाले
अजित पवार म्हणाले, थांबा म्हटलं तर थांबले नाहीत यावर शरद पवारांचं प्रत्युत्तर
|